राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिलारवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..आज दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली शिलारवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात तेथील ग्रामपंचायत सदस्य विष्णू कांबडी, वामन हिंदोला, गणेश भगत, शंकर हिंदोला, दिनेश भगत, बुधाजी शेंडे, अरुण शेंडे, एकनाथ हिंदोला, योगेश शेंडे, कृष्णा हिंदोला, माधव शेंडे, यशवंत शिंगवा यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रसंगी तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तालुका संघटक शिवराम बदे, विभाग प्रमुख बाजीराव दळवी, माजी उपसभापती मनोहर थोरवे, उत्तम शेळके, अनिल शेमटे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते...