उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील अवैध वाळू उपश्याला बसणार चाप
पोलिसांच्या ताफ्यात गस्तीला आली स्पीड बोट
मिलिंद लोहार-पुणे
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील उजनी धरण पाणलोट क्षेत्रात वाळू तस्करांचा हैदोस सुरू होता मात्र महसूल आणि पोलिस यंत्रणा यांच्याकडे अत्याधुनिक साधनसामग्रीचा अभाव असल्याने कित्येकदा वाळू तस्कर पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी होत होते आता मात्र इंदापूर पोलिसांच्या ताफ्यात स्पीड बोट आल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या स्पीड बोटमुळे अतिजलद गतीने गस्त वाढणार असून अवैध वाळू उपश्याला चाप बसणार आहे.