Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोरोना रोगापासून बचाव करण्यासाठी जास्तीतजास्त लसीकरण करून घेणे गरजेचे :- पालकमंत्री नाम .अदितीताई तटकरे

 कोरोना रोगापासून बचाव करण्यासाठी जास्तीतजास्त लसीकरण करून घेणे गरजेचे :- पालकमंत्री नाम .अदितीताई तटकरे 

अमोल चांदोरकर - श्रीवर्धन


जिल्ह्याच्या पालकमंत्री नाम अदितीताई तटकरे यांच्या हस्ते श्रीवर्धन तालुक्यातील मेघरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामाचे भूमिपूजन व प्राथमिक आरोग्य केंद्र वाळवटी येथे 102 एम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा  संपन्न झाला .या वेळी बोलताना अदितीताई म्हणाल्या की ,कोरोनाचे संकट अजून गेलेले नाही ,कोरोना रोगापासून बचाव करण्यासाठी जास्तीतजास्त लसीकरण करून घेणे गरजेचे आहे .कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेवर जास्तीतजास्त निधी देण्याचे नियोजन असल्याने तसेच तटकरे साहेबांचा खासदार निधी देखील गेले 2 वर्ष मिळाला नसल्याने खासदार निधीतीतील तसेच इतर विकासकामांना निधी प्राप्त होऊ शकला नसल्याने विकास कामे खोळंबली ,मात्र ग्रामस्थांनी ज्या कामांबाबत निवेदने दिली आहेत ती सर्व कामे व प्रलंबित सर्व विकास कामे लवकरच मार्गी लागतील ,मेघरे येथील ग्रामपंचात कार्यालयाची जुनी इमारत तशीच ठेवून तिला डागडुजी करून ती इतर लोकोपयोगी कामात आणावी ,नवीन इमारत बांधताना कंत्राटदाराने लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकासकामे करावीत ,पुढील कालावधीत निधीची कमतरता भरून काढू आणि सर्व कामे मार्गी लावू असे सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र वाळवटी ला भेट दिली होती त्यावेळेस सर्व पाहणी करून रुग्ण सेवेसाठी चांगली एम्ब्युलन्स देणे क्रम प्राप्त असल्याने आज या एम्ब्युलन्स चे लोकार्पण करताना आणि इमारतीच्या दुरुस्ती साठी 15 लाखाचा निधी उपलब्ध केला याचे समाधान असल्याचे सांगितले .या वेळी शासनाच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या कोरोना महामारीत उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाम .अदितीताई यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले .एम्ब्युलन्स लोकार्पण कार्यक्रमणानंतर वाळवटी येथे बागमांडला जि .प .गणातील विकासकामांचा आढावा घेताना नाम अदिती ताई यांनी सांगितले कि कुठलाही निधी लॅप्स होता कामा नये ,याची खबरदारी संबंधित  शासकीय अधिकाऱ्यांनी वर्गाने घ्यावी ,तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील लक्ष ठेवावे अशी सूचना केली .

यावेळी पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या समवेत महंमद मेमन ,तालुका अध्यक्ष दर्शन विचारे ,उपाध्यक्ष सूचिन किर ,जी प सदस्या प्रगती अदावडे ,पं .स सदस्य मंगेश कोमनाक ,हरेश्वर सरपंच अमित खोत ,तहसीलदार सचिन गोसावी ,गटविकास अधिकारी उद्धव होळकर ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दीपक पांडे ,सर्व शासकीय विभागाचे अधिकारी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies