भिलवडीतील पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
सुधीर पाटील सांगली
संपुर्ण महाराष्ट्र संकटाचा सामना करीत आहे .कोरोना त्यानंतर दरड कोसळने आणि महापूर यामुळे राज्यावर संकटाची मालिका सुरूच आहे . अश्या परिस्थीतीत जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही . विशेष म्हणजे भिलवडी परिसराची पहाणी केल्यामुळे येथील नुकसान मोठे झाले आहे . हे समजते यामुळे भिलवडी करांना वाऱ्यावर न सोडता मदत केली जाईल . असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिलवडी येथील आयोजीत सभेत केले . यावेळी राज्यमंत्री डॉ . विश्वजीत कदम . खा .धेर्यशील माने .आ .सूमनताई पाटील . आ . अरूण लाड .आ . अनिल बाबर .आ . मोहनराव कदम . राज्याचे सचिव सिताराम कुठे . जि.प. सदस्य सुरेंद्र वाळवेकर माजी जि.प. सदस्य संग्राम पाटील . सरपंच सविता महींद - पाटील . माळवाडी सरपंच व तांबोळी सुखवाडी सरपंच वैशाली यादव . उपस्थित होते . मुख्यमंत्र्यांनी औदुंबर . अंकलखोप येथे भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला .