ऐन सणासुदीच्या काळात प्राथमिक शिक्षकांचे वेतन न झाल्याने शिक्षक वर्ग हवालदिल
अमूलकुमार जैन-अलिबाग
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत प्राथमिक विभागात 6313 शिक्षक आणि इतर शिक्षकेत्तर कर्मचारी हे कार्यरत आहेत. मात्र या विभागात कार्यरतअसणाऱ्या कर्मचारी वर्गाचे वेतन हे पंधरा तारखेच्या पूर्वी होत आले आहेत.मात्र कदाचित काहीवेळेस एखादं दिवस उशिराही होतो.मात्र त्यांनी त्यांना काही फरक पडत नाहीत. मात्र ज्यावेळी एका महिन्याचा वेतन हे दुसरा महिना संपत आला तरी होत नाही यावेळी कर्मचारी यांच्या महिन्याची आर्थिक घडी बिघडत असते.त्यामुळे त्याचा संतुलन बिघडून चिडचिड निर्माण होत असते.जुलै2021 चे हे ऑगस्ट 2021 संपत आला तरी झालेला नाही.ऐन सणासुदीच्या तोंडावर वेतन हे वेळेतच होणे आवश्यक आहे. मात्र हे वेतन रक्षाबंधन पूर्वी होईल अशी अपेक्षा शिक्षक कर्मचारी यांना होती.मात्र जिल्हा परिषदेतील कार्यलायतील काही कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे ऑगस्ट महिना संपण्यास काही दिवस शिल्लक असतानासुद्धा वेट झालेले नाही.त्यातच पुढील सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव येत आहे.गणेशोत्सव हा आवडतासण आहे.जुलै2021 वेतन हा उशिरा काढण्यात आला तसेच ऑगस्ट चेही वेतन उशिरा झाल्यास कर्मचारी यांना सणासुदीच्या काळात कोनापुढेतरी हात पसरण्याची वेळ येणार आहे हर निश्चितच.
आमचे प्रतिनिधी जिल्हा परिषद मध्ये गेले असता तेथील एक कर्मचारी पगार कधी होतील अशी विचारणा करीत होते
शासनाच्या आदेशानुसार कर्मचारी यांचे वेतन हे पाच तारखेपर्यंत होणे आवश्यक आहे.मात्र काही वर्षे शासनाच्या आदेशाप्रमाणे वेतन हे व्यवस्थित तारखेला जमा होत होते.गेल्या काही वर्षांपासून कर्मचारी यांचे वेतन उशिरा होत आहे.
काही कर्मचारी यांनी त्यांच्या सोसायटीचे कर्ज घेतलेले असतात कर्जाचे हप्ते हे ठराविक तारखेला जमा झाला पाहिजे नंतरच्या तारखेला जमा झाला तर त्यावरील व्याज हे कर्मचारी यांना भरावे लागत आहे हा आर्थिक भुर्दंडही त्यांना सहन करावा लागत आहे.
आज दिं.25 ऑगस्ट2021 रोजी पगार हे बँकेत जमा झाले असल्याचे एका शिक्षकांने आमच्या प्रतिनिधीस सांगितले.आज बँकेत पगार जमा झाला असेल तर ते उद्या परवा आमच्या खात्यात जमा होईल त्यानंतर आम्हाला त्या पैशाचा वापर करता येईल.तरी पुढच्या महिन्यात गणेशोत्सव सण येत आहे त्यामुळे आम्हाला आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
शिक्षकांचे वेतनबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिक्षक बाळासाहेब येडके यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची देत प्रथम सांगितले की,ज्याच्या टेबलावर वेतनसंदर्भात काम आहे ते रजेवर आहेत तरी त्याला विचारून उत्तर देतो.नंतर परत संपर्क साधला असता त्यानीं उत्तर दिले की पगार बिल पाठवले आहे.त्यांना कधी पाठवले आहे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की तुम्हाला काय करायचे?असे बोलून फोन ठेवून दिला.
शिक्षकांच्या पगाराबाबत प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांना विचारणा केली असता मी सध्या नाशिक मध्ये आहे.शिक्षकांचे पगार हे जिल्हा परिषद यांच्याकडून जिल्हा कोषागार विभागाकडे आणि तेथून परत जिल्हा परिषद कडे आणि तेथून गटविकास अधिकारी यांच्याकडे जातात आणि तेथून पगार यांना वितरित केले जाते.