पुरग्रस्तानची मदत करीत संतोष जैतापकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी
ओंकार रेळेकर-चिपळूण
भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष जैतापकर
गेली अनेक दिवस मदतकार्य करत आहेत. सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहीत कोणतेही संकटात ते नेहमीच पुढे असतात
जीवनआवश्यक वस्तू,धान्य किट,पाणी इत्यादींचे जैतापकर यांनी पूरग्रस्त भागात वाटप केले.पुढेही ज्या ज्या ठिकाणी मदत कार्य लागेल तिथे आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे संतोष जैतापकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, कोरोना महामारी संकट काळातही जैतापकर यांनी गुहागर सह अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्व खर्चाने मदतकार्य केले होते.पूरग्रस्त भागात संतोष जैतापकर यांनी केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे .अशी प्रतिक्रिया माजी.आ.विनय नातू यांनी व्यक्त केली