इजिप्तचा ग्रँडमास्टर फॉझी आधाम ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
उमेश पाटील -सांगली
या स्पर्धेत भारतासह कजाखिस्तान, अर्जेंटिना, जॉर्जिया, इराण, युक्रेन, अर्मेनिया, उझबेकिस्तान, क्यूबा, इंडोनेशिया, इस्राइल, रशिया यांसह अनेक देशांतील ग्रँडमास्टर्स, आंतरराष्ट्रीय मास्टर्स, फिडे मास्टर्स सहभागी झाले होते. यात अर्जेंटिनाचा फिडे मास्टर रोबेलडो क्रिस्टियन हा ७५ गुणांसह या स्पर्धेचा उपविजेता ठरला. पश्चिम बंगालचा मानांकित खेळाडू सुभयान कूंदू यास या स्पर्धेमध्ये ६६ गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. पश्चिम बंगालचाच मानांकित खेळाडू संकेत चक्रवर्ती यास ६३ गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. दोमिनिकनचा फिडे मास्टर गुझमन ख्रिस्तोफर यास ५२ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले.
पुरोहित चेस अकॅडमीचे प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन केले गेले. तांत्रिक पंच म्हणून चंद्रशेखर कोरवी, दीपक वायचळ, सारंग विवेक पुरोहित आणि शार्दूल तपासे यांनी काम पाहिले.