माथेरान मधील विकास कामांवर अंकुश ठेवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज !
चंद्रकांत सुतार -माथेरान
माथेरानमध्ये पहिल्यांदा एवढी मोठया प्रमाणावर विकासाची कामे पूर्ण केली जात आहेत ही खरोखरच सर्व माथेरान करांसाठी आनंदाची बाब आहे. परंतु होत असलेली ही सर्व भागातील कामे कशाप्रकारे पूर्ण करण्यासाठी घाईघाईने ठेकेदारांनी गावातील ज्यांना बांधकामामधील कामाची कोणतीही माहिती नाही अशांना बहुतेक ठिकाणी कामांवर सब ठेकेदार नेमून कामे पूर्ण केली जात आहेत. हे सब ठेकेदार गावातील आणि विशेष म्हणजे सत्ताधारी गटातील आपल्याच मर्जीतील असे नेमले आहेत त्यामुळे होणाऱ्या कामांना कुणाचाही विरोध अथवा आक्षेप येऊ नये हाच ठेकेदाराचा मुद्दा आहे. अशावेळी काही माध्यमे सुध्दा आपली पोळी भाजून घेण्यासाठी ठेकेदाराकडे फेऱ्या मारताना दिसत असून अनेकजण आपले हात ओले करण्यासाठी खटपट करीत आहेत. माथेरान ह्या ठिकाणी एवढी मोठी कामे पूर्ण करण्यासाठी सत्ताधारीगट जरी प्रयत्नशील असले तरी सुद्धा या कामांवर कुणाचाही अंकुश दिसत नाही काही नगरसेवकांनी आपल्या घरातील लोकाना प्रत्येक कामात समाविष्ट करून घेतलेले आहे याचा अर्थ गावातील गरजवंत मुलांना कामे देण्याऐवजी स्वतःच्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारत आहेत.अनेक ठिकाणी होत असलेली कामे ही अत्यंत निकृष्ट आणि लवकरच डबघाईला येणारी आहेत त्यामुळे करोडो रुपयांचा चुराडा समस्त माथेरानकर सुध्दा उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. कस्तुरबा रोड तसेच पॅनोरमा हॉटेल जवळील कामे आणि त्यातच लावण्यात आलेले कमकुवत क्ले ब्लॉक खूपच ढिसुल असून त्याची एकाच वर्षात माती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच जनता हॉटेल ,व मेघदूत हॉटेल मधील सध्या मोरीचे काम सुरू आहे सदर मोरी वर स्लॅब कव्हर टाकताना शिगांची जाळी बांधणे आवश्यक होती , पण तसे न करता कॉन्ट्रॅक्टर व सुपरवाईजर यानी मोरीवर जुने पत्रे लावत त्यावर आडवे दोन चार अँगल ठेऊन त्यावर खडी माल अथरला आहे, आधीच त्या मोरी मध्ये पाण्याचे पाईप केबल आडवे आहेत त्यामुळे त्या मोरीचा कितपत फायदा पाणी जाण्यासाठी होईल यात शंखा आहेच ,भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करूनच माथेरान चा विकास कामे होत असताना अनेक पॉईंट च्या रस्त्यावरील ब्लॉक मध्ये आताच मोठाले चिरा पडायला लागल्या आहेत,त्यामुळे ही कामे किती तग धरतील ,धरायला लावतील हे पाहणे गरजेचे आहे,
सदर ठेकेदाराचा नगरपरिषदेला अनेक वेळेस तक्रारी आल्या आहेत.दोनतीन वेळी येथिल काम केलेले बांधकामही कोसळले होते परंतु सदर ठेकेदार हा कामात अजुनही चालढकल करत आसेल तर ते फार गंभीर आहे नगरपरिषदेचा अभियंत्याने सदर ठिकाणी जाऊन ठेकेदारास अवश्यक त्या सुचना करुन सदर कामात काही त्रुटी आसतील तर त्या तपासुन संबधीतांवर उचित कारवाई केली पाहिजे.
शिवाजी शिंदे...नगरसेवक
शिवाजी शिंदे...नगरसेवक
पॅनोरमा हॉटेल ते शब्बीर भाई दुकानापर्यतचा रस्त्याचे काम क्षत्रिय कन्स्ट्रक्शन यांचे आहे, या ठिकाणी क्रॉस ड्रेनचे काम अत्यन्त निकृष्ट दर्जाचे केले आहे यावर जुने पत्रे ठेऊन त्यावर जुने अँगल ठेवले व काँक्रीट माल टाकला आहे कोणत्याही प्रकारचे स्टील वापरले नाही , हा महत्वचा रहदारीचा रस्ता असल्याने त्यावरून घोडे , हात रिक्षा , जात असतात , भविष्यात पत्रा सडला तर तो स्लॅब नक्कीच खचणार तरी याकडे जागृत नागरिक व अधिकारी वर्गाने लक्ष देणे गरजेचे आहे
प्रदिप घावरे.. माजी नगरसेवक