अखिल मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षकांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून जपली सामाजिक बांधिलकी
सुधाकर वाघ-मुरबाड
कोरोनाचे दुसऱ्या लाटेचे संकट संपत आले असतांनाच यावर्षी वरुण राजाने महाराष्ट्रावर दुसरे अस्मानी संकट उभे केले. संपूर्ण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहा:कार माजविला. अनेकांचे संसार रस्त्यावर आले.होत्याचे नव्हते झाले.या पूरग्रस्तांना व दरडग्रस्तांना महाराष्ट्रातून अनेक मदतीचे हात पुढे आले.
आपणही पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा या सामाजिक बांधीलकेने 'अखिल मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रुपये - 75000/ चा धनादेश मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी शीला लंबाटे मॅडम यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष संजय घागस, अरुण गोडांबे, ठाणे-पालघर शिक्षक पतपेढी चे अध्यक्ष दिपक देसले,तालुका अध्यक्ष नितिन राणे,उपाध्यक्ष बाळकृष्ण भावार्थे ,तालुका सरचिटणीस मंगेश इसामे,सर्व शिक्षा अभियान विषयतज्ज्ञ रमेश तुंगार, दिलिप इसामे, चंद्रकांत दवणे, संजय देशमुख,योगेश चौधरी, अजय देशमुख, शेखर वाघचौडे, प्रकाश वाघचौडे,तसेच कार्यकारिणीचे इतर पदाधिकारी होते.
त्यानंतर अखिल मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेने तारांगण मतिमंद मुलांची निवासी शाळा शिरवली येथे जाऊन संस्थेला आर्थिक स्वरूपात 5000/ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला व तेथील मुलांना (खाऊ- फळे ) इत्यादी वाटप करण्यात आले. या संघटनेकडून दरवर्षी असे अनेक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली जाते.