मुलं होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचे अपहरण करून दिला बळी
भिमराव कांबळे-कोल्हापुर
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वरद हा आपले आजोळ सावर्डे बुद्रुक येथे आजोबा दत्तात्रय शंकर म्हातुगडे यांच्या घरांच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी आई-वडिलांसोबत गेला होता. मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास तो बेपत्ता झाला. रात्रभर व दुसऱ्या दिवशी सर्वत्र शोध घेवूनही त्याचा शोध लागला नाही. भरवस्तीत असणाऱ्या गल्लीतून वरद गायब कसा झाला याबाबत तर्क वितर्क वर्तवले जात होते. या गल्लीत नेहमी नागरिकांची वर्दळ असते. अशा ठिकाणाहून तो गायब झाल्याने हे कृत्य कोणीतरी माहितगार व्यक्तीचे असण्याची शक्यता व्यक्त झाली होती.
वरदचे सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथून दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. याबाबतची तक्रार त्याचे वडील रवींद्र गणपती पाटील यांनी मुरगूड पोलिसात दिली. परंतू पोलिसांना वरदचा शोध घेण्यात अपयश आले, त्याचा मृतदेह सोनाळी येथील डोंगरात आज मिळून आल्याने पंचक्रोशीतील नागरिक व महिलांतून प्रचंड संताप व्यक्त झाला. त्यांनी पोलिसांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी मारुती वैद्य या क्रूरकर्मा व्यक्तीने अपहरण करून बळी दिल्याचे मान्य केल्याचे सांगण्यात येते.