काशीद समुद्रात बुडणाऱ्यास जीवरक्षक यांच्याकडून जीवनदान
अमूलकुमार जैन-अलिबाग
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सलीम शेख आणि त्याचे नातेवाईक असे आठजण आज दिनांक 26 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी चिंचवड येथून काशीद येथे येण्यासाठी निघाले होते. ते दुपारी दोनच्या सुमारास काशीद येथे पोहचले.काशीद समुद्र किनारी मौजमजा करीत असताना समुद्रात पोहण्याचा मोह झाला असता सलीम शेख आणि इतर पाच नातेवाईक पोहण्यासाठी समुद्रात गेले.आणि इतर दोन नातेवाईक हे समुद्रकिनारी थांबले होते.मात्र सलीम शेख यास पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात दूर गेला.परत समुद्र किनारी येण्यासाठी सलीम शेख हा प्रयत्न करीत होता मात्र तो समुद्रात खेचला जात होता. त्याला वाचविण्यासाठी त्याच्यासोबत असणाऱ्या नातेवाईक यांनी समुद्रकिनारी असणाऱ्या पर्यटक यांना विनवणी करीत होते.त्यावेळी तेथे जीवरक्षक काशिद बीचवरील जीवरक्षक राकेश रक्ते याने, तत्परतेने याने खोल समुद्रात पोहत जाऊन पाण्यात बुडत असणार्या सलिम याला सुखरूप करणारया बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले ,
जीवरक्षक राकेश रक्ते याच्या या कार्याबद्दल कौतुक होत आहे.