शिवसेनेच्या कर्जत-खालापूर विधानसभेच्या संपर्कप्रमुखपदी पंकज पाटील यांची नियुक्ती
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
शिवसेनेच्या कर्जत-खालापूर विधानसभेच्या संपर्कप्रमुखपदी पंकज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याच्या उच्चविद्याविभूषित असल्याचा फायदा पक्ष संघटना अजून बळकट करण्यास होईल असं बोललं जातं.
पंकज पुंडलिक पाटील यांची शिवसेनेच्या "189 कर्जत-खालापूर विधानसभेच्या संपर्कप्रमुख" पदी नियुक्ती करण्यात आली.आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते आज त्यांना शिवतीर्थ पोसरी येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. त्या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख गायकर, जिल्हा सल्लागार भरत भाई भगत, विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे तालुका संघटक शिवराम बदे, खालापूर पंचायत समिती सदस्य उत्तम परबळकर, ज्येष्ठ शिवसेना नेते उत्तम शेळके, विभाग प्रमुख शैलेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.