रायगडमधील आघाडीसाठी दोन्ही खासदार सरसासावले
राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांची दोन तास रंगली गुप्त बैठक..
बैठकीनंतर सर्व अलबेल असल्याचा दावा...
मात्र शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावरच लढणार आमदार महेंद्र थोरवे यांचे म्हणणं
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी तातडीने रायगडमध्ये येऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली ज्यामध्ये सेना पदाधिकाऱ्यांकडून तटकरेंच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला तर दुसरी कडे खासदार तटकरे यांनी देखील राजकीय उत्तर द्यायला राष्ट्रवादी समर्थ असल्याचे सांगीतल्याने आज अलिबाग मध्ये झालेल्या जिल्हा नियोजन बैठकी कडे सर्वांचे लक्ष लागले होते या बैठकीत जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी जाहीरपणे पालकमंत्री निधी वाटपात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केल्याने तणाव निर्माण झाला मात्र शिवसेनेच्याच आजी माजी आमदारांनी नवगणे यांना गप्प केले यानंतर खासदार सुनील तटकरे आणि सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांची एक गुप्त बैठक तब्बल दोन तास सुरू होती यामध्ये शिवसेनेचे कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे हे आक्रमक भुमिकेत होते त्यांना समजावण्यात दोन तास निघून गेले बैठकी नंतर मात्र सर्व जण आघाडीचा धर्म पाळणार असल्याची सारवासारव करण्यात आली.
शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवणार-आमदार महेंद्र थोरवे