पुण्यातील संतापजनक घटना!
१४ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार,प्रकृती चिंताजनक;
घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली
प्रियांका ढम- पुणे
रिक्षाचालकाने अपहरण करुन आपल्या मित्राच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या हरविलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना या मुलीला पोलिसांनी चंदीगडहून ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी वानवडी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यामध्ये रेल्वेचे दोन कर्मचारी, ५ रिक्षा चालक व इतर आरोपींचा सहभाग आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे तब्बल दोन दिवस या मुलीवर नराधमांनी अत्याचार केले आहेत. पहिल्या दिवशी चौघांनी तर दुसर्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला.