कंदी पेढ्यांचा हार घालून आय.ए.एस उत्तीर्ण प्रथमेश राजेशिर्के यांचा सत्कार
अतिदुर्गम भागात गोर गरीब जनतेची सेवा करायची आहे : प्रथमेश राजेशिर्के
ओंकार रेळेकर-चिपळूण
भविष्यात आपल्याला अतिदुर्गम भागात गोर-गरीब जनतेची सेवा करायची आहे असे आयएएस उत्तीर्ण प्रथमेश राजेशिर्के यांनी येथे बोलताना सांगितले सोमवारी सकाळी नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी प्रथमेश राजेशिर्के यांच्या मांडकी येथील निवासस्थानी जाऊन विशेष गौरव केला.
अत्यंत कठीण परिस्थितीतून शिक्षण घेत असताना माझे वडील स्वर्गीय अरविंद राजेशिर्के यांच्या प्रोत्साहनामुळेच मी शिक्षणात यश संपादन करू शकलो परंतु माझ्या आयुष्यात अत्यंत दुःखद असा प्रसंग म्हणजे या परीक्षेचा अभ्यास करीत असतानाच मे महिन्यामध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले गरीब परिस्थितीतून कसेबसे पैसे उभे करून बाबांनी मला शिक्षण दिले त्या कठीण प्रसंगाची आठवण माझ्या मनात सदैव राहुल राहील भविष्यात जिथे जिथे शैक्षणिक दृष्ट्या माझ्या गरीब बांधवांना शैक्षणिक मार्गदर्शन लागेल तिथे मी करणार आहे या प्रसंगातून माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की मला या शिक्षणातून ज्या पदावर सेवेची संधी मिळेल या सेवेची सुरुवात मी अतिदुर्गम भागातील गोर-गरीब नागरिकांची सेवा करूनच करणार आहे असे आयएएस उत्तीर्ण प्रथमेश राजेशिर्के यांनी येथे बोलताना सांगितले.