कर्जतचा प्रतीक जुईकर IAS परीक्षा पास
रायगडकरांची अभिमानाने मान उंचावली,प्रतीक देशात 177 वा
आदित्य दळवी-कर्जत
वडील चंद्रशेखर जुईकर हे नेरळ जवळील कोल्हारे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.प्रतिकचे दहावीपर्यंतचे शिक्षण अभिनव ज्ञान मंदिर शाळेत झालं तर 12वी पर्यंतचे शिक्षण त्याने कल्याण येथील बिर्ला कॉलेजमधून घेतलं. आयआयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण त्याने इंदोर येथे घेतलं त्यानंतर त्याने पुण्यातील टाटा मोटर्समध्ये 2 वर्ष असिस्टंट मॅनेजर पदावर काम करून नोकरी सोडून दिली आणि त्याने पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी पुढील शिक्षण घेऊन आयएएस उत्तीर्ण झाला आहे.चौथ्या प्रयत्नात प्रतीक ही परीक्षा पास झाला आहे.,कठोर मेहनत आणि जिद्दीचे हे फळ असून,देशासाठी काम करावयाचे असल्यास या व्यतिरिक्त अनेक संधी असून तरुणांनी या कडे लक्ष पुरवल्यास या कठोर परिश्रम घेतल्यास या संधी प्राप्त होतील अशी प्रतिक्रिया प्रतिकने महाराष्ट्र मिररशी बोलताना व्यक्त केलीय.
तर वडील चंद्रशेखर जुईकर यांनी सांगितले की,प्रतिकने कठोर मेहनतीने ही परीक्षा पास केली असून आम्हांला अत्यानंद झाला आहे.