आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली प्रतीक जुईकरची घरी जाऊन भेट,केला सत्कार
आदित्य दळवी-कर्जत
कर्जतचा पहिला आयएएस प्रतीक जुईकर याची कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिकच्या राहत्या घरी भेट घेऊन अभिनंदन केलं आणि कर्जतच नाहीतर पूर्ण रायगड जिल्ह्याचे नावं उज्ज्वल केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.प्रतिकचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उत्तम कोळंबे,नगरसेवक संकेत भासे,कर्जत खालापूर विधानसभा संघटक पंकज पाटील,महिला आघाडीच्या रेखाताई ठाकरे ,प्रतिकचे आईवडील उपस्थित होते.