दीनदुबळ्यांचे भाऊ-पद्मविभूषण कर्मवीर भाऊराव पाटील
मिलिंदा पवार-खटाव
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी झाला झाला . भाऊरावांचे मूळ घराणे अत्यंत कर्मठ होते परंतु भाऊरावांनी लहानपणापासूनच कधीही जात न मानता बहुजन समाजासोबत व अस्पृश्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले.
भाऊरावांवर राजश्री शाहू महाराजांचा प्रभाव होता.आणि दलित व अस्पृश्य समाजासाठी खूप काम केले.
भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना ४ ऑक्टोबर १९१९ रोजी सातारा येथील काले या गावी केली केली .' कमवा व शिका' च्या माध्यमातून शिक्षणाची द्वारे गरीब व गरजू मुलांना खुली केली
.शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागात पोहोचावी म्हणून त्यांनी १९३५ मध्ये महात्मा फुले अध्यापक विद्यालय सुरू केले
.पुणे विद्यापीठाने भाऊरावांना १९५९ मध्ये सन्माननीय डि.लीट ही पदवी बहाल केली
.भाऊराव पाटलांनी साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात वसतीगृह सुरु केले केले व ते सुरू करण्यासाठी त्यांना आपल्या पत्नीचीही मोलाची मदत लाभली वसतिगृह सुरू करण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्रही व दागिने ही त्यांना विकावे लागले होते.
भारतातील सर्वोच्च पुरस्काराचे पद्मभूषण पुरस्काराचे भाऊराव पाटील हे मानकरी आहेत.
९ मे १९५९ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मृत्युपश्चात सातारा येथे त्यांचे स्मृति स्थान व कर्मवीर स्मृती भवन उभारण्यात आले आहे.कर्मवीर यांच्या स्मृती तिथे जतन करण्यात आल्या आहेत . बहुजन समाजाला शिक्षणाच्या आधार देणार्या महान व्यक्तिमत्वास कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन