मुश्रीफांचा तिसरा घोटाळा 1500 कोटींचा; सोमय्यांचा कोल्हापूरात पत्रकार परिषदेत आरोप
जय कराडे - कोल्हापूर
भाजप नेते किरीट सोमय्या हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मुश्रीफ यांनी तब्बल 1500 कोटींचा घोटाळा केला असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व ग्रामपंचायतीसाठी एक नियम केला. त्यांनी सगळ्या ग्रामपंचायतींसाठी एक ऑर्डर काढली. तुमच्या टॅक्सचं रिटर्न मी सांगेल ती कंपनी भरणार. तुमचं जीएसीटी, टीडीएस रिटर्न मी सांगेल तीच कंपनी आणि मी सांगणार तेवढी फी द्यायची अशी ऑर्डर काढली.