ही तर ठाकरे सरकारची दडपशाही, अशा धमक्यांना भीक घालत नाही; सोमय्यांचा कराड मधील पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे सरकारवर हल्लाबोल
कुलदीप मोहिते-कराड
भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत राज्यातील ठाकरे सरकार वर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांच्या इशारा वर माझ्यावर कारवाई झाली असून शरद पवारांचा सहभाग असल्याशिवाय हे शक्यच नाही असा आरोप किरीट सोमय्या यांनी केले
किरीट सोमय्या म्हणाले, ही ठाकरे सरकारची ठोकशाही असून गणेश विसर्जनापासून मला रोखलं लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की, घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक केली जात आहे. मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायची आहे, तक्रारदाराला राखण्याचे काम, जिल्हाबंदी करण्याचे काम ठाकरे सरकारने केलं आहे. मला दिलीप वळसे पाटील यांना विचारायचे आहे की मला कोणत्या आदेशा अंर्तगत गणेश विसर्जन करण्यापासून रोखलं, मला माझ्या कार्यालयात कोंडून ठेवण्यात आलं.
ठाकरे सरकारने माजी सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने मला संरक्षण दिलं. राष्ट्रवादीच्या भाई लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे असं सोमय्या यांनी म्हंटल. ,उद्धव ठाकरेंची इच्छा आहे किरीट सोमय्ायंवर हल्ला व्हावा, याचं उत्तर दिलीप वळसे पाटील यांना द्यावं लागेल.
भाजप नेते किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी पहाटे ओगलेवाडी रेल्वे स्टेशनवरून घेतले ताब्यात
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे या आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी आपण मुश्री फ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यावर मुश्रीफ यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या कोल्हापुरात आले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. या सर्व घडामोडी पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस पाठवली. त्यांनी सोमय्या यांना कोल्हापुरात दाखल होऊ नये, असा आदेश दिला. पण तो आदेश न जुमानता सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याचा निर्णय कायम ठेवला. पोलिसांच्या विरोधानंतरही कोल्हापूरकडे निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड मध्ये ओगलेवाडी रेल्वे स्टेशन वर कराड पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कराडमध्ये किरीट सोमय्या यांना उतरवण्यात आले आहे यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर व व भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात ओगलेवाडी रेल्वे स्टेशन वर उपस्थित आहेत