फुलला फुलला रान मोगरा फुलला
दर तीन वर्षांनी बहरतो हा मोगरा
चंद्रकांत सुतार-माथेरान
माथेरान मध्ये सध्या कारवी जातीचा रानटी झाडे फुलाणी भहरले आहे माथेरान मध्ये सर्वत्र पॉईंट फिरत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस ही सफेद फुले तुम्हाला आकर्षित करतात, मोगऱ्या सारखीच ह्या फुलांची कळी असते, ही फुले पूर्ण फुलली की निळ्या पांढऱ्या रंगाची असतात, या फुलांना कोणताही प्रकारचा वास येत नाही, ही फुले पूर्ण फुलल्यावर मधमाश्या मोठ्या प्रमाणावर यातून मधा साठी रजकण गोळा करतात ,कारवी हे छोटे झाड दर तीन वर्षांनी बहरते , आणि ज्या वेळी कारवी बहरते त्या वर्षी मध मिळन्याचे प्रमाण ही वाढते, अशी ही कारवी जातीचे छोटे झुडपे सध्या माथेरान मध्ये बहरली आहेत, निसर्ग जीव सृष्टीसाठी सर्व काही देत असतो, माथेरान मध्ये पुढील जाणेवारी महिन्या पर्यंत निसर्गाचे दिवसेंगणित विविध रूपे आपणास पाहवयास मिळतील त्या साठी निसर्गाच्या सानिध्यात माथेरान ला भेट दयावी च लागेल