सजग कृतीशील पत्रकारिता म्हणजे शीतलताई करदेकर
"चेंबूर येथील मुलीला तिच्या वडिलांकडून मारहाण " हा व्हिडीओ महाराष्ट्र मिररने हा व्हिडिओ शेअर करून पत्रकारितेचा धर्म निभावला आहे.महाराष्ट्र मिररचा पत्रकारितेतील या वाघिणीला म्हणजे शीतलताई यांना मानाचा मुजरा!
परवा NUJ महाराष्ट्र या संघटनेच्या व्हाट्सअप्प ग्रुपवर चेंबूर येथील लहान मुलीला तिच्या वडिलांकडून मारहाण तिच्या सावत्र आईच्या सांगण्यावरून होतानाचा व्हिडिओ आला तो पण त्यांनीच शेअर केला होता,त्यांच्या दिवंगत आईच्या नावाने कार्यरत असलेली सुमनालय फाऊंडेशन ही संघटना आहे त्यांच्याकडे ही तक्रार आली! ताईनी घटनेचे पुरावे मागितले आणि पुरावे गोळा करूनच त्यांनी तो व्हिडीओ ग्रुपवर शेअर तर केलाच तसेच अनेक मंत्री आणि गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ट्विट करून त्वरित कारवाई करण्यास भाग पाडले.पोलिसांनीही त्वरित दखल घेतली.कामगार विभागातील नीलाम्बरी भोसले यांनी उचित कृतीसाठी सहकार्य केले हे महत्त्वाचे! आपल्याला आलेला व्हिडीओ आपण लगेच ग्रुपवर शेअर करतो पण त्या व्हिडीओच्या खोलात शिरत नाही,नेमका व्हिडीओ कुठला आहे ,कधीचा आहे,खरा आहे की खोटा याची शहनिशा न करता आपण फॉरवर्ड करत असतो.पण शीतलताई यांच्या सजग पत्रकारितेने एका मुलीला नाहीतर तिच्या छोट्या भावाला न्याय मिळाला हे पूर्ण सत्य आहे. पत्रकारिता फक्त बातमीदारी नाही तर उचित वेळेत मदत करणे,संबंधित विभागामार्फत कृती होण्यास भाग पाडण्यात असते! महाराष्ट्र मिररची टॅग लाईन सुद्धा तीच आहे."थेट बांधीलकी आपल्याशी . शीतलताई यांच्या सांगण्यावरून अनेक अधिकारी पदाधिकारी यांनी या चेंबूर प्रकरणात लक्ष लागून या मुलीला आणि तिच्या छोट्या भावाला आता न्याय मिळेल.खरंतर याचं श्रेय शीतलताई यांनाच जातं. अभिनंदन करायचे असेल तर त्यांचं करा.महाराष्ट्र मिररने हा व्हिडीओ शेअर करून पत्रकारितेचा धर्म निभावला आहे.महाराष्ट्र मिररचा पत्रकारितेतील या वाघिणीला म्हणजे शीतलताई यांना मानाचा मुजरा!
संपादक
महाराष्ट्र मिरर
शीतल करदेकर
संपर्क नंबर-9821209870
(या नंबर तुम्ही त्यांना अभिनंदनाचे व्हाट्सअप्प मॅसेज करू शकता.)