नवजात शिशुला मिळाले गुरे राखणाऱ्यामुळे जीवदान!!
अपर्णा-लोहार
महाराष्ट्र मिरर टीम
रायगड जिल्ह्यातील रोहा येथे माणुसकीला काळिमा फासणारी व हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. रोह्यातील कब्रस्थानच्या झुडपात एक नवजात बालक अज्ञाताने फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली.. या घटनेने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होतोय. ताविस लद्दु वय 21 हा नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेला असता कावळ्यांचा कळप पाहुन त्याला संशय आला, एवढ्या मोठ्या प्रमाणात कावळे जमलेले पाहून तो झुडपाच्या दिशेने गेला, कावळे मोठ्या प्रमाणात त्या नवजात बालकाला चोच मारत होते, जिवाच्या आकांताने ते बालक तडफडत होते. ते पाहून लद्दु याच्या हृदयाला पाझर फुटला,
ते बालक त्याने उचलून घेतले, व त्या जखमी बालकाला सुरक्षित रित्या उचलून घेतले, त्याने रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना फोन करून घटनेची माहिती दिली, रोहा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ताबीद हा देवदूत वेळीच पोहचला म्हणून त्या शिशुचे प्राण वाचले, मात्र या बालकाचे पालक यांची करावी तितकी विभत्सना कमीच आहे.