पुरग्रस्तांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टींची पदयात्रा
जलसमाधीचा दिला होता इशारा
प्रा.जय कराडे - कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना तात्काळ मदत देण्यात यावी. तसेच २०१९ च्या नियमानुसार वाढीव मदत व इतर मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.या वेळी राजू शेट्टी यांनी ८ दिवसात पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून वाढीव मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारला इशारा दिला होता तसेच ८ दिवसांत पूरग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत तर नृसिंहवाडी या ठिकाणी पंचगंगा नदी व कृष्णा नदीच्या संगम तीरावर आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला होता.
राजू शेट्टी यांनी प्रयाग चिखली येथून पदयात्रेला सुरवात केली होती.आज नृसिंहवाडी येथे राजू शेट्टी जलसमाधी घेणार असलेमुळे घटनास्थळी प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.नदिच्या पात्रामध्ये रेस्क्यु आॅपरेशन टिम च्या तुकड्या तैनात असल्याचे चित्र दिसत होते.पंचगंगा पदयात्रेला सुरवात होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले काही कार्यकर्त्यांनी नदीपात्रात उड्या मारल्या परंतु पोलिसांच्या रेस्क्यु आॅपरेशन टिम ने आंदोलनकर्त्यांना सुखरूप बाहेर काढले.याघटनेचे गांभीर्य लक्षात घेता राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना संयमाचा सल्ला दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना उद्या मुख्यमंत्र्यांच्या “ वर्षा " बंगल्यावर या विषया संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले आहे.उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मध्ये काय चर्चा होणार या विषयाकडे सर्व पूरग्रस्तांसह राज्याचे लक्ष केंद्रित झालेले आहे.