उल्हासनदीचं प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना साकडं
आदित्य दळवी-कर्जत
पुण्यातील बोरघाटातून उगम पावणाऱ्या आणि कल्याण मोहने येथून वसई खाडीला मिळणाऱ्या उल्हास नदीची लांबी 127 किमी असून या उल्हास नदीचं खोरं आहे या उल्हास नदीचं 90 टक्के पाणी हे समुद्राला मिळत आणि या नदीच्या पात्रातून 11 नगरपालिका/महानगरपालिका यांच्या पाणी योजना आहेत.तसेच या नदीच्या पिण्याचे पाण्याचे प्रदूषण झालं असून हे प्रदूषण रोखण्यासाठी कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते समीर सोनी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांना एका निवेदनाव्दारे साकडं घातलं आहे.आज त्यांनी केंद्रीय मंत्री यादव यांची पनवेल येथे भेट घेऊन निवेदन दिले आहे.
औरंगाबाद येथील वाल्मी या संस्थेने केलेल्या सर्वे नुसार उल्हास खोऱ्यातील 90 टक्के पाणी हे ज्यावेळी समुद्राला जाऊन मिळत त्यावेळी ते वाया जात त्यामुळे या खोऱ्यात भूमिगत धरणं बांधावीत असा अहवालही तयार करण्यात आला होता शिवाय या नदीला मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाने घेरलं असून हे प्रदूषण रोखण्यात यावे अशी विनंती वजा निवेदन समीर सोनी यांनी मंत्री यादव यांनी दिल आहे.