"शोशाला पिक" क्लायबिंगची भारतीय पहिलीच मोहीम फत्ते
शिवदुर्ग मित्र लोणावळाने यशस्वी केली मोहीम
आदित्य दळवी-कर्जत
"शोशाला पिक"क्लायबिंगची ही भारतीय पहिलीच मोहीम होती. म्हणजे या पुर्वी भारतामधील कोणीही हे शिखर सर केलेले नाही.सलग बारा दिवसांच्या अथक परिश्रमा नंतर काल उशिरा शिवदुर्ग टिमच्या क्लायंबरनी मोहीम फत्ते केली .
आणि शोशाला पिक क्लायबिंगची ही भारतीय पहिलीच मोहीम होती. म्हणजे या पुर्वी भारतामधील कोणीही हे शिखर सर केलेले नव्हते. सलग बारा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर शिवदुर्ग टिमच्या क्लायंबरनी मोहीम फत्ते केली . पुर्ण मोहीमेत टीमला पाऊस आणि थंडीचा खूप सामना करावा लागला . पुर्ण मोहीम ही सचिन गायकवाड ,ॲड संजय वांद्रे, सुनील गायकवाड, अशोक मते, राजेंद्र कडु, आनंद गावडे, महेश मसने, गणेश गिद यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली .
शोशाला पिक उंची : 750 मीटर (क्लायबींग रुट)
(समुद्र सपाटीपासुन 4700 मिटर)
मोहीम नेते-सचिन गायकवाड
क्लायबिंग टीम रोहीत वर्तक, भुपेश पाटील , योगेश उंबरे , ओंकार पडवळ, समीर जोशी ,शिवम आहेर .