शौर्यवीर मयूर शेळके आणि कु.साक्षी लाड यांचा कर्जत नगरपरिषदेतर्फे सत्कार
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
काही महिन्यांपूर्वी प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर तोल जाऊन पडलेल्या लहान मुलाचा जीव मयूर शेळके याने वाचविला होता त्याने अतुलनीय शौर्य दाखविले होते त्याबद्दल त्याचा तसेच रायगड जिल्ह्याच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघात दहिवली येथील कु. साक्षी विलास लाड या महिला क्रिकेटपटूची निवड करण्यात आली आहे म्हणून तिचा या दोघांचा कर्जत नगरपरिषदेच्यावतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता.
व्यासपीठावर व्यासपीठावर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणी पुरवठा सभापती सभापती राहुल डाळींबकर, बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे उपस्थित होत्या. मयूर शेळके आणि कु.साक्षी लाड यांचा नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
मयूर शेळके याने घटने विषयी माहिती सांगतांना ही घटना घडली तेव्हा मला दहा दिवसाचे बाळ माझ्या घरी होते, त्या अंध महिलेच लहान मूल रुळावर पडलं आणि ते ट्रेन खाली चिरडणार ही घटना माझ्या मनाला पटत नव्हती मी क्षणाचा विलंब न करता उडी मारून त्या मुलाचे प्राण वाचविले, मी श्री सदस्य आहे या मागे तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या विचारांची ताकद आहे असे सांगितले.
नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी सद्गुरू ने तुमच्या हातून चांगले काम केले अश्या शौर्यवीराचा सत्कार करण्याचं भाग्य आम्हा कर्जतकरांना लाभले असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविंद्र लाड यांनी केले.
याप्रसंगी नगरसेवक विवेक दांडेकर, नगरसेविका प्राची डेरवणकर, सुवर्णा निलधे, कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू, जितेंद्र गोसावी,सारिका कुंभार, सुदाम म्हसे, रुषिता शिंदे, सुनिल लाड,अशोक भालेराव, अविनाश पवार, कल्याणी लोखंडे,विशाल पाटील, बापू बेहराम,सामिया चौगुले, विलास गायकवाड, शेखर लोहकरे आदी सह कु. साक्षीचे काका दिलीप लाड, काकी चित्रा लाड उपस्थित होते.