जिल्हा आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान
मिलिंदा पवार -खटाव
आदर्श अभियंता पुरस्कार वितरण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पालक मंत्री बाळासाहेब पाटील,बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई अध्यक्ष उदय कबुले,उपाध्यक्ष प्रदीप विधाते,मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माण खटाव या विभागामध्ये सुभाष चन्द्र दत्तात्रेय खाडे यांनी पंचवीस वर्ष सेवा केलेली आहे.बांधकाम विभागाचे काम गुणवत्तापूर्वक व दर्जेदार व्हावे याकडे त्यांचे लक्ष असते.आतापर्यंतच्या सेवेची दखल घेऊन सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्यांना आदर्श अभियंता पुरस्कारासाठी निवड केली व हा पुरस्कार सोहळा अतिशय दिमाखात व सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला तसेच हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.