शरद कुंभार यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
आदित्य-दळवी-कर्जत
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्रातील गुणवंत शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षक रत्न पुरस्कारने सन्मानित केले जाते. पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र गौरव पदक सन्मानचिन्ह, आणि मानपत्र या स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आला.श्री शरद कुंभार सर हे शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व, विद्यार्थीप्रिय उपक्रमशील क्रीडा शिक्षक आहेत. उत्तम क्रीडा प्रशिक्षक, राष्ट्रीय हॉलीबॉल पंच, राज्य कबड्डी पंच, अतिरिक्त जिल्हा समादेशक आर. एस. पी. नवी मुंबई ,आर्म स्पोर्ट्स रायगड जिल्हा उपाध्यक्ष ,कर्जत तालुका डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशन कार्यवाह ,कर्जत तालुका कबड्डी असोसिएशन सहकार्यवाह, महाराष्ट्र राज्य क्रीडा आघाडी कार्याध्यक्ष ,शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ रायगड जिल्हासंघटक, कुंभार समाज सामाजिक विकास संस्था रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अशा सामाजिक, शैक्षणिक क्रीडाक्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपणारे आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन या विषयाचे ग्रामीण भागात कॅम्प आयोजित करून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती , ग्रामस्वच्छता या विषयांवर पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती करतात. रस्त्यावर होणारे वाहनांचे अपघात रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देतात. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना मध्ये सहभागी होतात त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना या आगोदर ही विविध पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहेत त्यामध्ये कोकण रत्न पुरस्कार, नेशन बिल्डर अवॉर्ड, उत्कृष्ट तज्ञ मार्गदर्शक पुरस्कार ,कल्याण-डोंबिवली सामाजिक संस्थेचा विशेष गौरव पुरस्कार, अशा विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे अशा या कार्यतत्पर कर्तव्यदक्ष शिक्षकाला राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१ मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे