खैराची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने जप्त
रोहा वन विभागाने केली कारवाई
महाराष्ट्र मिरर वृत्त-रोहा
याबाबत उपवनसंरक्षक व महावनसंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक रोहा यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून शुक्रवारी, दि.27 ऑगस्ट 2021 रोजी मौजे विघवली फाटा येथे उभा असलेला ट्रक क्रमांक MH 16/Q7151 तपासला असता त्यामध्ये खैर सोलीव लाकडे विनापरवाना आढळून आली तसेच आजूबाजूला तपास केला असता MH 06/BG0089 या क्रमांकाचा टाटा एस टेंपो उभा असलेला दिसून आला. हा टेम्पो तपासला असता त्यात खैर सोलीव लाकडे सापडली. संबंधित वाहनांवर वनविभागाच्या पथकाने कारवाई करीत माणगाव नाणोरे विक्री आगारावर दोन्ही वाहने मालासह जप्त केली.
ही कारवाई रोहा वन विभागाचे उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत, सहा वनसंरक्षक रोहा विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल फिरते पथक ईच्छांत कांबळी, वनक्षेत्रपाल माणगाव पी.पी.आर.पाटील, वनरक्षक अजिंक्य कदम, वनरक्षक तेजस नरे, वनरक्षक योगेश देशमुख यांनी पार पाडली असून पुढील तपास सुरु आहे.