प्रदीप गोगटे यांना पुरस्कार
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
15 वर्षांचे नाट्यक्षेत्रातील कार्य आणि बालनाट्य चळवळ यासाठीचे भरीव योगदान ! आई-वडील, बहीण माधुरी, भाऊ दिलीप आणि सर्व सहकारी, मित्र-परिवार यांच्या सर्वांचे सहकार्याने आणि देवाच्या आशीर्वादाने आणि प्रचंड मेहनत, सातत्य यामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे प्रदिप गोगटे सांगतात. कलाकारांना व्यासपीठ देणाऱ्या आर्ट बिट्स फाऊंडेशन पुणे यांच्याकडून मिळणारा हा मानाचा पुरस्कार म्हणजे या क्षेत्रात अजून चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी ताकद मिळणारा आहे असे गोगटे सांगतात.
2004 ला नाट्यक्षेत्रात श्री विठ्ठल संस्थान दहिवली येथून त्यांनी सुरुवात केली. वरचा मजला रिकामा, घरोघरी मातीच्या चुली, सौजन्याची ऐशीतैशी, मोरूची मावशी, ही दिशा कोणती, धादांत खैरलांजी, फार फार तर काय, अजगर, वस्त्रहरण आणि तीन फुल्या तीन बदाम या नाटकांतून अभिनय साकारला आहे. 2007 ला ही दिशा कोणती या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले आहे. वस्त्रहरण नाटकात मच्छीन्द्र कांबळी यांनी अजरामर केलेली तात्या सरपंच ही भूमिका साकारली.त्यांना मिळाल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.