कर्जतच्या सुभाष भोईर यांना युवा कला गौरव पुरस्कार
नरेश कोळंबे -कर्जत
कोण आहे सुभाष भोईर?
कलाक्षेत्रातील शिक्षण - पखवाज वादन अजून शिकत आहे - संगीत अभ्यास - तींनताल , एकताल, झपताल, दादरा , केहरवा, चौताल, मत्तातला , रुद्रताल , सवारी ,दिपंचदि ,खेमटा, सुलताल, रूपक , धमार , भजनी इत्यादी .. तालांचा अभ्यास झाला आहे व पुढे घेत अजून घेत आहे
एकूण अनुभव - वयाच्या 7 व्या वर्षांपासून पखवाज वादन ही कला शिकत आहे. वयाच्या 9 वर्षी सर्वात प्रथम भजन गायक बुवांच्या जोडीला साथ केली व त्या नंतर अनेक भजन प्रोग्रॅम साथ करू लागला. शास्त्रीय संगीत प्रोग्रॅम गायन कलाकारांना पखवाज , तबला साथ ,वयाच्या 12 व्या वर्षी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत सहभागी झालेल्या भजन गायक अजय रुठे याना पखवाज वादन साथ केली होती व ते थेट प्रक्षेपण स्टार माझा या चैनल वर झाले होते .कोकण आगर महोत्सव कर्जत या पखवाज वादन स्पर्धेत 2012 साली दृतीय क्रमांक व 2013 साली प्रथम क्रमांक प्राप्त केला होता . कॉलेजला असताना यूथ फेस्टिव्हल ला 2016, व 2017 , साली सहभाग घेऊन त्यात झोनल मध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त केले होते व मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये 2017 साली उतेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले होते .
व्याघ्रेश्वर नवतरुण भजन मंडळ पाली व नाद ब्रम्ह भजन मंडळ अलिबाग यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय भजन स्पर्धेत मला उत्कृष्ट पखवाज वादन पारितोषिक मिळाले आहेत .