वीज वितरणने गणेगाव मधील गंजलेले आठ खांब बदलले
अॅड.संपत पांडुरंग हडप यांनी केला होता सातत्याने पाठपुरावा
नरेश कोळंबे-कर्जत
गणेगाव येथील खराब झालेल्या वीज खांबांचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याच्या पाठपुराव्याला यश आले आणि गावातील खूप वर्षांपासून सडत पडलेले वीज खांब आज खऱ्या अर्थाने बदलून गावातील मुख्य समस्या दूर झाली एखादा वीज खांब जरी पडला असता तरी मोठी जीवितहानी झाली असती हे गांभीर्य लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत वीज खांब बदलले गेले पाहिजेत हे सहाय्यक अभियंता रितेश साबदे यांनी ठरवलं आणि प्रत्येक्षात कामाला सुरुवात करून गावातील खूप मोठी अडचण दूर केली काही दिवसात चिंचवली गाव येथील खराब झालेले वीज खांब आणि दोन्ही गावातील वाढत्या वसाहती मधील अडचणीच्या भागातील विजखांब बसविण्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन साबदे यांनी अॅड.संपत पांडुरंग हडप यांना दिल. कामासाठी गावातील तरुणांनी देखील मदत केली नथुराम देशमुख,धनाजी थोरवे,महेंद्र आंबेकर,कैलास थोरवे,सचिन हडप,प्रसाद कर्णूक,अक्षय तिखंडे,अतुल हडप,वैभव देशमुख, सुशांत मोहिते,शुभम राऊत, धनेश हडप,प्रथमेश देशमुख,रोहित हडप, शिवम हडप,यश हडप इत्यादी तरुण नेहमी प्रमाणे मदत कार्यात पुढे होते