Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

काँग्रेसचे २७ रोजी भारत बंद आंदोलन उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे प्रशांत यादव यांचे आवाहन

काँग्रेसचे २७ रोजी भारत बंद आंदोलन उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे प्रशांत यादव यांचे आवाहन

ओंकार रेळेकर-चिपळूण










शेतकऱ्यांना आणि कामगारांना नेस्तनाबूत करणारे कायदे केंद्र सरकारने आणले, देशात बेरोजगारी वाढत असून तरुण देशोधडीला लागला आहे. तसेच महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅससह जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम महागाई निर्माण केली आहे. केंद्र सरकारच्या या हुकूमशाहीविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (ता. 27) भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांनी केले आहे.

      श्री. प्रशांत यादव म्हणाले, की केंद्र सरकारने हुकूमशाहीने शेतकरीविरोधी तीन काळे कायदे आणले. उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020 आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020 या तीन कायद्यांमुळे संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती पूर्णतः ढासळली आहे. देशभरातील शेतकरी काळ्या ऋषी कायद्यांविरोधात एकवटलेला असताना 11 महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची मोदी सरकारने दखल घेतलेली नाही. नेहमीच हुकूमशाहीने वागणाऱ्या केंद्र सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्याचा अनेक मार्गांनी प्रयत्न केला. दहशतवादी, नक्षलवादी आणि देशद्रोही असल्याचे आरोप करून आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. याचबरोबर महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतींचे खिसे भरण्याची खेळी मोदी सरकारकडून सुरू आहे. देशातील महागाई वाढवून देशातील सर्व संवैधानिक संस्था ताब्यात घेऊन, सार्वजनिक संस्था विकून शेतकरी व सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे पाप भाजप सरकार करत आहे. पेट्रोल आणि डिझेलसह घरगुती गॅसचे दरही दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. म्हणून भाजप सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना, डाव्या आघाड्यांनी तीव्र आवाज उठवला असून सोमवारी दि. 27 रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.  

      अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. श्रीमती सोनियाजी गांधी, मा. खासदार श्री. राहुलजी गांधी यांनी दिलेल्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी या आंदोलनात राज्यातील जनतेला पूर्ण ताकदीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तरी या आंदोलनात चिपळूण तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, आघाडीचे पदाधिकारी त्याचबरोबर व्यापारी यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन आणि सरकारी व खासगी संस्था, शिक्षण संस्था यांनी कडकडीत बंद ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे नम्र आवाहन चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने सर्वांना करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies