....अखेर सौंदत्ती रेणुका मंदिर भाविकांना दर्शनासाठी झाले खुले
महाराष्ट्र मिरर टीम
दरम्यान श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी प्रशासनाने काही अटी लादल्या आहेत. मंदिरात देवीचे दर्शन भक्तांना घेतील घेता येईल. मात्र, अन्य धार्मिक कार्यक्रम घेण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत. मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांना व अन्य विधींना बंदी घालण्यात आली आहे. सामाजिक अंतर राखून, मास्क सेनिटायझरचा वापर करूनच देवीचे दर्शन घेता येणार आहे. मंदिरात दर्शनापूर्वी थरमल्स स्क्रीनिंग होणार आहे.
मंदिर परिसर व आसपासच्या मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद राहणार आहे. रिंगरोड येथील दुकान गाळ्यात व्यापाराची परवानगी असेल. आज मंगळवारी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असताना, मंदिर प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांनीही नियमांचे पालन करूनच मंदिरात दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कोटागस्ती यांनी केले आहे.