अमित शहांना गजनीचा झटका येत असेल तर उद्धव ठाकरे रामशास्त्री बाण्याचे!
चंद्रकांत सुतार -माथेरान
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जसजशा जवळजवळ येत चालल्या आहेत तसं राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून आरोप-प्रत्यारोप टीका-टिप्पणी जोरदार होताना पाहायला मिळत आहे रविवारी माथेरानमध्ये फलकाचे अनावरण करून कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
लोकसभेतील गटनेते आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकट्याचे ताकदीवर विधानसभेचे 56 आमदार निवडून आले हा महाराष्ट्रात इतिहास आहे.त्यात शिवसेनेचा आकडा विधानसभेत कसा कमी राहील यासाठी आपला मित्र पक्ष प्रयत्न करीत होते.त्यामुळे नियतीच्या मनात होते आणि म्हणून कोणाचेही स्वप्नात नसताना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले.अरविंद सावंत यांनी माथेरानकरांना आवाहन करताना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यात युतीची सत्ता असताना 3000 हजारांचे मतांचे शहर असलेल्या माथेरान गिरीस्थान नगरपरिषद मधील प्रश्न घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याशी बैठक घेतली आणि त्यांना प्रश्न सांगितले हे माथेरानकरांनी विसरून नये असे आवाहन अरविंद सावंत यांनी केले.माथेरान ही आमच्या महाराष्ट्राची मान आहे आणि शिवसेनेची शान आहे हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सांगणे राहिले आहे.त्यामुळे माथेरानकरांनी शिवसेनेची साथ कायम दिली पाहिजे असे आवाहन शेवटी अरविंद सावंत यांनी केले. पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर बोलताना अरविंद सावंत यांनी वटवृक्षाच्या पारंब्याप्रमाणे सर्वांना एकत्रित घेऊन काम करावे आणि संघटना बळकट करून नवीन माथेरान घडवायचे आहे असे आवाहन देखील केले.वाढदिवसानिमित्त साधत गटनेते प्रसाद सावंत यांचा सत्कार खासदार सावंत यांच्या हस्ते झाला.