कराड तालुक्यात खुनाचं सत्र सुरूच
कुलदीप मोहिते -कराड
कराड तालुक्यात खुनाच्या घटनांचे सत्र काही केल्या थांबेना! पाटण तालुक्यातील चाफळ येथील युवतीच्या खुनाचे प्रकरण ताजे असतानाच शनिवारी रात्री धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आला.
कराड-पुसेसावळी रस्त्यावरील वाघेरी फाट्याजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली. माहिती मिळताच तालुका पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. रमेश रामचंद्र पवार (वय 40) असे धारदार शस्त्राने खून झालेल्या इसमाचे नाव आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड-पुसेसावळी रस्त्यावर वाघेरी फाट्या जवळ धारदार शस्त्राने रमेश पवार यांचा खून करण्यात आला. शनिवार रात्री ही घटना घडली. माहिती मिळताच कराड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
शहरातील रुक्मिणीनगर परिसरात महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. त्याच दिवशी रात्री दुसरी खुनाची घटना घडल्याने कराड तालुका हादरला आहे. पोलिसांनी संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.