कराडमधील वाखान भागात महिलेचा गळा चिरून हत्या
अपर्णा लोहार- सातारा
कराड शहरातील वाखान भागात भाड्याच्या घरात राहणार्या महिलेचा गळा चिरून अज्ञाताने निर्घृण खून केल्याची घटना आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली आ हे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. उज्ज्वला ठाणेकर (वय 32), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
कराडमधील वाखान परिसरातील एका घरात महिलेचा खून झाला असल्याची माहिती मिळताच कराडचे पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर हे पोलीस कर्मचार्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर महिलेचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याचे निदर्शनास आले. उज्ज्वला ठाणेकर (वय 32), असे त्यांचे नाव आहे. भाड्याच्या घरात त्या एकट्याच राहत होत्या, असेही स्पष्ट झाले. त्यांची मुले वसतिगृहात असल्याची प्राथमिक माहिती देखील पोलिसांना मिळाली आहे.
महिलेच्या खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनेमागील कारणांचा शोध घेत आहेत. अद्याप तरी कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. दरम्यान, खुनाच्या घटनेची माहिती मिळताच वाखान परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली होती.