नांदगांव ग्रामपंचायत हद्दीतील भोपळी येथील ग्रामस्थांनी केला शिवसेनेत प्रवेश !
दिशाभूल करून घेतला होता राष्ट्रवादीत प्रवेश,ग्रामस्थांचे म्हणणं
24 तासाच्या आत कार्यकर्त्यांची घरवापसी
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
दिनांक १९ सप्टेंबर रोजी भोपळी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. सदर प्रवेश करतेवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खोटे आश्वासन देऊन पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेश करतेवेळी आम्हीच गोरगरीब जनतेचे पाईक आहोत असा आव आणून संपूर्ण गावाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असे दर्शविण्यात आले होते..ही आमची दिशाभुल होती आता आम्ही घरवापसी करत आहोत असं म्हणण आहे,अस भोपळी ग्रामस्थ शिवसेनेत प्रवेश करते वेळी बोलत होते.
२० सप्टेंबर रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा भगव्या झेंड्याखाली घरवापसी केली असून भोपळी येथील राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेश चर्चेला पूर्णविराम दिला आहे. या प्रसंगी तालुका संघटक शिवराम बदे,माजी उपसभापती मनोहर थोरवे, उपतालुका प्रमुख भरत डोंगरे, विभाग प्रमुख रवी ऐनकर, रवी फोपे, मा सरपंच नागेश साबळे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
प्रवेश करतेवेळी आमदार थोरवे यांच्या हस्ते स्थानिक आमदार विकास निधी सन २०२१-२२ निधी अंतर्गत भोपळे वाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे करिता निधीचे पत्र ग्रामस्थांकडे सुपूर्त करण्यात आले...