आजपासून काही स्मार्टफोनमध्ये चालणार नाही इंटरनेट, तुमच्या फोनचा तर समावेश नाही? पाहा डिटेल्स
टेक विश्व
अनुप ढम
लेट्स एनक्रिप्ट हे इंटरनेट आणि डिव्हाइस जसे की मोबाइल, लॅपटॉप, पीसीमध्ये कनेक्शनला एन्क्रिप्ट करण्यासाठी प्रमाणपत्र जारी करत असते. याद्वारे तुमचा डेटा सुरक्षित आहे व हॅकर्स याचा दुरुपयोग करत नसल्याचे सुनिश्चित होते. तुम्ही HTTPS पासून सुरू होत असलेल्या साइटला भेट देता, अशावेळी तुम्ही सुरक्षित वेबसाइटवर गेलेले असता. Let’s Encrypt ने ३० सप्टेंबरला जुन्या प्रमाणपत्रांचा उपयोग बंद केल्याने अनेक डिव्हाइसवर याचा परिणाम होईल.बहुतांश इंटरनेट यूजर्सवर याचा परिणाम होणार नाही. कॉम्प्युटर आणि ब्राउजर जे नवीन व्हर्जन अपडेट नाही, ते उद्यापासून इंटरनेटचा उपयोग करू शकणार नाहीत.
रिपोर्टनुसार, अप-टू-डेट नसलेल्या कॉम्प्युटर, टॅबलेट आणि स्मार्टफोनवर याचा परिणाम होईल. नवीन आणि अपडेटेड डिव्हाइसवर परिणाम जाणवणार नाही. macOS २०१६ आणि विंडोद एक्सपी चे जुने व्हर्जन वापरणाऱ्या यूजर्सला समस्येचा सामना करावा लागू शकतो.
सर्टिफिकेटची वैधता समाप्त झाल्यास ७.१.१ जुने व्हर्जन असलेल्या अँड्राइड डिव्हाइसवर इंटरनेट वापरता यणार नाही. आयफोनसाठी आयओएस १० पेक्षा जुन्या व्हर्जन असलेल्या डिव्हाइसवर याचा परिणाम होईल. जर तुमच्या फोनमध्ये जुने व्हर्जन असेल तर तुम्ही त्वरित अपडेट करून ही समस्या टाळू शकता.