शांतताप्रिय, परोपकारीवृत्तीच्या वरोरावासियांचे हृदयात विशेष स्थान -- डॉ. निलेश पांडे
राजेंद्र मर्दाने-चंद्रपूर
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महारोगी सेवा समिती, आनंदवनचे विश्वस्त तथा सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ आमटे, तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्थ तथा सीतारमण हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय पोळ, आनंदवन मित्र मंडळ, वरोरा व ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे मार्गदर्शक डॉ. वाय एस. जाधव, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सुधीर बुधे उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ पांडे पुढे म्हणाले की, वरोरा तालुक्यातील जनता कमालीची संयमी आहे, विविध घटनेत त्याच्यांकडून अडवणुकीपेक्षा सहकार्यच अधिक मिळाले. जीवनात घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा आढावा घेत केलेल्या कार्याची दखल घेऊन बदलीनंतर आनंदवन मित्र मंडळ, ओशनिक बहुउद्देशीय संस्था व म.रा. म. पत्रकार संघ, मसेस आनंदवन सारख्या नामांकित संस्थानी आनंदवनात आयोजित केलेला हा कार्यक्रम मला नेहमीच सत्कार्य करण्याची प्रेरणा देत राहील, असे त्यांनी नमूद केले.
तहसीलदार प्रशांत बेडसे आपल्या निरोपात म्हणाले की, प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांने नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. प्रशासन कार्यात नियमांचे अवंडबर न माजवता कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्यासाठी व तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी " व्हीजन डॉक्युमेंट " तयार करून अंमलबजावणी सुरू केली. कर्मचाऱ्यांत सकारात्मक दृष्टिकोन बिंबविल्याने व त्यांनीही मनापासून साथ दिल्याने कार्याची गती वाढून अपेक्षित यश गाठता आले. माझ्या अल्पावधीच्या कार्याची विशेष दखल घेऊन नामांकित सामाजिक संस्थांनी आनंदवनात आयोजित केलेला हा कार्यक्रम माझ्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील.
अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. विकास आमटे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश पांडे व तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या कार्याचा गौरव केला व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कौस्तुभ आमटे म्हणाले की, तालुक्यात शातंता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी डॉ.पांडे यांचे कार्य उल्लेखनीय ठरले. मिशन आनंद सहयोगमध्ये तहसीलदार बेडसे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच आनंदवनामध्ये कोरोनाचे पेशंट वाढत असताना आनंदवनात कोरोना सेंटर देऊन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी बेडसे पाटील यांचे भरीव योगदान दिले. याच माध्यमातून त्यांच आनंदवनाशी खास नातं जुळलं होतं. त्यांची उणीव निश्चित भासेल, असे नमूद करीत भविष्यातही ते सचोटीने कर्तव्य निभावतील, असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. विजय पोळ यांनी आपल्या मनोगतात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पाडे व तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या प्रशासकीय कार्यावर प्रकाश टाकला.
प्रास्ताविकात ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा आनंदवन मित्र मंडळाचे सचिव राजेंद्र मर्दाने यांनी सामाजिक संस्थेची भूमिका विषद केली. ते म्हणाले की, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पांडे व तहसीलदार श्री बेडसे पाटील यांनी पदाचा कधींही अहंकार न बाळगता सामाजिक बांधीलकी जपत सर्वच अभ्यागतांना एकसारखी व आपुलकीची वागणूक देत समस्यांचे निराकरण केले नेमक्या याच कार्यशैलीने त्यांचा एक आगळावेगळा ठसा उमटला. दोन्ही मान्यवरांच्या प्रशासकीय कार्याचे विविध पैलू उलगडून त्यांच्या सहकार्यामुळेच कोव्हीडवर नियंत्रण मिळविणे सोपे झाले असे नमूद केले. सेवानिवृत्त मंडळ अधिकारी बुंधे यांनी आपल्या सेवाकाळात गरीब, गरजवंत शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम केल्याचे अभिमानाने सांगितले.
तत्पूर्वी आनंदवन मित्र मंडळ, ओशनिक बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा वरोरा व महारोगी सेवा समिती, आनंदवन तर्फे डॉ. विकास आमटे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ, शाल, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, भेटवस्तू देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे, तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील व मंडळ अधिकारी सुधीर बुधे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सर्वश्री सदाशिवराव ताजने, सुधाकर कडू, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव शाहीद अख्तर, पत्रकार प्रवीण गंधारे, ओशनिक बहुउद्देशीय संस्था व आनंदवन मित्र मंडळाचे पदाधिकारी प्रा.बळवंत शेलवटकर, बंडूभाऊ देऊळकर, राजेश ताजने, राहुल देवडे, ओंकेश्वर टिपले, तुषार मर्दाने, संधी निकेतन मधील अपंगांच्या कार्यशाळेचे व्यवस्थापक तथा मिशन आनंद सहयोगचे रवींद्र नलगिंटवार, शौकत खान, इकराम पटेल, उमेश गुलाक्षे, अश्विनी आंधळकर, योगिनी पाटील, रोहीत फरताडे, अविनाश कुळसंगे व आनंदवनचे नागरिक निरोप समारंभाकरीता उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले तर आभार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा वरोऱ्याचे अध्यक्ष बाळू भोयर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण गंधारे, राजेश ताजने, शरद नन्नावरे, संजय गांधी, सूनिल वरखडे आदींनी सहकार्य केले.