महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब यांच्या हस्ते खालापूर मधील पहल या संस्थेच्या माध्यमातून पहिल्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उदघाटन!
महाराष्ट्र मिरर टीम-खालापूर
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील खालापूर येथे पहल संस्थेच्या माध्यमातून नवीन स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उदघाटन संपन्न झाले.
खालापूर तालुक्यात नव्याने स्थापन होणाऱ्या औद्योगिक क्षेत्रामुळे तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यातून तरुणांना स्किल डेव्हलपमेंट च्या माध्यमातून नवीन कोर्सेस शिकवले जाणार आहेत, आणि त्याचा फायदा पुढील कालावधीत नोकरी मिळण्याकरिता होणार आहे.
या उदघाटन प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे,भरत भाई शहा,उपविभागीय अधिकारी अजित नैराळे,तहसिलदार आयुब तांबोळी, पीआय विभुते, खालापूर मुख्याधिकारी रश्मी चव्हाण ,सुरेखा भणगे,नगराध्यक्ष शिवानी जंगम, खालापूर तालुका प्रमुख संतोष विचारे ,शहर प्रमुख उमेश गावंड, अंकुश भारद्वाज,सर्व खालापूर ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते.......