लसीकरण बाबतीत हलगर्जीपणा नको , आदिवासीवाड्या पर्यंत लसीकरण मोहीम राबवा - आमदार महेंद्र थोरवे
- आ.महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न !
- कोविडविषयक परिस्थिती संदर्भात घेतला आढावा..
- लसीकरणावर भर द्यावा
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
आज पार पडलेल्या बैठकीत सर्वच शासकीय अधिकारी यांनी कोविड परिस्थितीत केलेल्या कामाचे विशेष कौतुक आमदार थोरवे यांनी केले. येणाऱ्या तिसऱ्या लाटे संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश आमदार थोरवे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस प्रांताधिकारी अजित नैराळे, तहसिलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉ बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोरे, नायब तहसीलदा सुधाकर राठोड, नगरसेवक संकेत भासे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते...