जैबुनीसा शेख यांनी कर्जत विधानसभा अल्पसंख्याक महिला अध्यक्षपदी निवड
सोहेल शेख-कर्जत
जैबुनीसा शेख यांनी काही दिवसांपूर्वी कर्जत येथे झालेल्या मेळाव्यात राज्याचे मंत्री उदय सावंत व आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. जैबुनीसा शेख यांचे सामाजिक कार्य पहाता त्यांना शिवसेनेत कोणत्यातरी पदावर काम करण्याची संधी पक्षाकडून मिळेल हे नक्की होते व आज त्यांना थेट कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रात काम करण्याची संधी शिवसेनेने दिली आहे .
जैबुनीसा शेख यांची मुस्लिम समाजात महिलांप्रति खूप आस्था आहे तसेच त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यांनी निर्माण केलेल्या संस्था व बचतगट त्यांच्या सामाजाकी कार्याची पोहचपावती देतात त्यांना दिलेल्या पदाने अनेक मुस्लिम बांधव व महिला शिवसेनेत उघडपणे कार्य करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.