सातारा जिल्ह्यात वनविभागाच्या धाडी.5 जणांवर कारवाई 2 जणांना कोठडी ..
मिलिंद लोहार-सातारा
कोल्हापूर वनविभागने एकाच वेळी इस्लामपूर, कोल्हापूर, सातारा, कराड, ठिकाणी वेगवेगळ्या टीम तयार करून पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर धाड टाकल्या
सदर सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर असा वन्यजीव शेड्युल 1 भाग 1 तसेच मधील वनस्पती , प्रवाळ, वन्यजीव अवयव असे साठा सापडून आला आहे.हत्ता जोडी (घोरपडीचे गुप्त अंग) -18,समुद्री पंखा / इंद्रजाल(ब्लॅक कोरल) - 19,साळ शिंग (कोल्हा सदररुष कातडे) यासह इतर वनुउपज चंदन , डिंक , कोळसा , शिकेकाई, पांढरी मुसळी, नरक्या, बेहडा , कारवाई मध्ये सापडले आहे.याप्रकरणी तीन दुकानावर कारवाई करण्यात आलेली आहे
उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक महेश झाझुरणे , वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे हे होते.