भाजप जिल्हा भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षपदी विद्या प्रकाश तामखडे यांची नियुक्ती ...
महाराष्ट्र मिरर टीम-खोपोली
भाजप उत्तर रायगड जिल्हा भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षपदी कामोठे येथील विद्या तामखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्तीपत्र भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज नियुक्त पत्र देऊन निवड करण्यात आली, यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, कामोठे मंडल अध्यक्ष रविंद्र जोशी, भटके विमुक्त आघाडी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबनराव बारगजे, भाजपा कळंबोली मंडल भविआ अध्यक्ष आबा घुटूकडे, पनवेल मंडळ भविआ अध्यक्ष गोपीनाथ मुंडे, व्यापारी आघाडी कामोठे अध्यक्ष नानासाहेब मगदूम, कामोठे व्यापारी आघाडी संयोजक कैलास सरगर, सहसंयोजक उत्तम जाधव आदी उपस्थित होते.
विद्याताई तामखडे यांना भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून भारतीय जनता पार्टीचा सामाजिक समरसतेचा संदेश उत्तर रायगड जिल्हयातील प्रत्येक नागरिकांपर्यंत विविध उपक्रम व कार्यक्रमांतर्गत पोहोचविण्याबरोबरच जिल्हयातील पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करणे आणि आगामी काळात विविध निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळवून देण्यासाठी जिल्हा भटके विमुक्त आघाडी काम करेल अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नडडा, महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विद्याताई तामखडे भाजपाचे ध्येय धोरण व कार्यक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावली करतील अशी, खात्री बबन बारगजे यांनी व्यक्त केली.