कोल्हापुरातल्या भुदरगड तालुक्यातील आदमापुर येथे बाळुमामांचा १२९ वा जन्मकाळ सोहळा उत्साहात
हजारो भाविकांची उपस्थिती, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
निरंजन पाटील-कोल्हापूर
-महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्रप्रदेश,गोवा, राज्यातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड )येथील सदगुरू बाळुमामां यांचा १२९ वा जन्मकाळ सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. बाळुमामा च्या नावाने चांगभलं च्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ढोल कैताळाच्या गगनभेदी आवाजात,भंडार्याच्या मुक्तहस्ते उधळणित हा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.
बाळुमामा च्या जन्म काळ उत्सवासाठी विस्तार महिन्याच्या कालावधीत भावीकांनी मोठी गर्दी केली होती. बाळु मामा मंदिरा मध्ये गाभाऱ्यात समाधीस्थळ व मुर्ती ची जरबेरा फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. बाळूमामाचां पाळणा झेंडूच्या व जरबेरा फुलांनी सजवला होता .संपूर्ण मंदिर व कळसावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
आदमापूर येथील ह.भ.प.नानासाहेब पाटील यांचे दुपारी यांचे कीर्तन झाले. काकड आरती ,अभिषेक,समाधीचे पुजन,आदी धार्मिक विधी पार पडले.त्यानंतर दुपारी ४ वा.२३ मिनिटांनी श्रीं चा जन्मकाळ सोहळा संप्पन्न झाला.यावेळी श्री च्या पाळण्यावर भाविकांनी फुलांचा वर्षाव केला. सुहासिनी नी पाळणा पुजन केले. पाळणा गीत गाईले. यावेळी भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.सर्व भाविकांनी बाळूमामांचे व पाळण्याचे दर्शन घेण्यासाठी आणि फूले वाहण्यासाठी गर्दी केली यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.सुटंवडा वाटण्यात आला.तसेच बाळुमामांचे निर्वाणस्थळ श्री. मरगुबाई मंदिरामधून जन्म समाधी स्थळी श्रींच्या अश्वासह भंडारा आणून श्रीं चा पालखी सोहळा झाला.भाविकांनी व सुवासिनींनी पालखीचे व अश्वाचेऔक्षण केले श्रींच्या पाळण्याचे पुजन देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांंच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी बाळुमामा देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, कृषीउत्पन्न बाजारसमितीचे माजी अध्यक्ष- दत्तात्रय पाटील,गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे,संभाजीराव भोसले,
बाळुमामा फौंडेशनचे अध्यक्ष-सरपंच विजय गुरव,पोलीस पाटील ,ग्रामसेवक डी.बी.मान,भक्तगण मोठ्यासंख्येने उपस्थित होता.