कळंब येथे बँकेला आग
महाराष्ट्र मिरर टीम
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात कळंब येथे असलेल्या बँक ऑफ बडोदाला आग लागली असून त्यात कोणीही कर्मचारी नसल्याचे माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे,आगीचा भडका उडाला असून दरवाजा बंद असल्याने आत मोठया प्रमाणात आग भडकली आहे. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे,धुराचे लोळ बाहेर येत असून लोकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.