Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

चिपळूणची पुरापासून मुक्ती व्हावी, यासाठी प्रयत्नशील- नाना पटोले

 चिपळूणची पुरापासून मुक्ती व्हावी, यासाठी प्रयत्नशील- नाना पटोले

             ओंकार रेळेकर-चिपळूण


काही महिन्यापुर्वी राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने चांगली बाजी मारली होती. हीच भुमिका आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिका निवडणुकीत घेण्यात येईल.  चिपळूण व परसिराची पुरापासून मुक्तता व्हावी, नुकसानग्रस्तांना दिलासा मिळावा. यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

प्रदेशाध्यक्षा नाना पटोले म्हणाले, चिपळूण शहर हे काही नव्याने वसलेले नाही. अनेक पावसाळे,आणि पूर या शहराने पाहीलेली आहेत. पण या घटना अलिकडच्या काळात घडत आहेत. यासंदर्भातील निळी आणि लाल रेषा निर्माण करून चिपळूण आणि कोकणच्या विकासाचे नुकसान होत असेल. तर त्या रेषा रद्द केल्या पाहीजेत. शहरवासीयाच्या भावना यापूर्वीच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे कळवलेल्या आहेत. यासंदर्भात बैठकही झाली आहे. पूर पुन्हा येऊ नये यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही चर्चा झाली आहे.  

काँग्रेसचे कार्यकर्ते हे जनतेच्या संपर्कात असले पाहीजेत. काँग्रेसचे विचार तळागाळात पोहचून पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकाचा झाला पाहीजे. यासाठी आम्ही सारे प्रयत्न करीत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत जनतेने पक्षाला आर्शिवाद दिला. चार क्रमांकाचा पक्ष म्हणून जे आजपर्यत हिनवले जात होते. तो पक्ष या निवडणूकीत पहिल्या नंबरवर पोहोचला आहे. महाराष्ट्र हे काँग्रेस विचारांचे राज्य आहे आणि त्या पध्दतीने आम्हाला पुढे जायचे होते. त्यानुसार चुका दुरूस्त करून पुढे गेलो आहे.  केंद्र सरकाच्या महागाई, बेरोजगारी, शेतकरी कायदे विरोधात आम्ही 14 ते 20 नोव्हेंबरपर्यत एक सप्ताह साजरा करणार आहोत. त्यामध्ये विविध आंदोलने, जेलभरो आंदोलनाबरोबरच मुंबई गोवा महामार्ग खड्डयांबाबत रायगड ते सिंधुदूर्गपर्यत आंदोलन करणार आहे. महापूरातील मदतीबाबत बोलताना ते म्हणाले की, नुकसान झाले असताना कागदपत्र विचारत न बसता सरसकट मदत मिळाली पाहीजे. ही नैसर्गिक आपत्ती असल्याने केंद्रानेही मदतीचा ओघ देणे आवश्यक होते. राज्यावर गेले तीन वर्षे सातत्याने आपत्ती येत असतानाही राज्याला मदतच करायची नाही असे धोरण केंद्राने घेतले असल्याचे दिसत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष लाड, तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, माजी खासदार हुसेन दलवाई, शहराध्यक्ष लियाकत शाह आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies