सातारा गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची सातारा शहर पोलीस स्टेशन ला अचानक भेट
गृहराज्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये
कुलदीप मोहते-सातारा
- राज्य गृहमंत्री शंभूराज देसाई यांची शहर पोलीस स्टेशनला अचानक भेट
- कोणताही गाजावाजा न करता राज्य गृहमंत्री दुचाकीवरून पोहचले पोलीस स्टेशनला
- गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कोणताही गाजावाजा न करता अचानक पणे सातारा शहर पोलीस स्टेशनला भेट दिली मात्र या भेटीमध्ये गैरहजर पोलीस अधिकारी यांचा भरघोस समाचार घेतला
सातारा शहर पोलीस स्टेशनचा कारभार व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येतो सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गृहराज्यमंत्र्यांनी थेट एका पोलीस कर्मचाऱ्याला हे गुन्हेगार येथे का आहेत त्यांचा गुन्हा काय आहे व यांचा तपास कशाप्रकारे चालला आहे याची माहिती घेतली असता पोलीस हवालदार चाचपत बोलत होता व आधार कार्ड दे असे खुद्द गृहराज्यमंत्र्यांनी विचारल्यानंतर हवालदार अवाक होऊन त त प प करत होता मात्र पोलिस स्टेशनमध्ये कर्मचारीवर्ग नाही हे पाहिल्यानंतर शंभूराज देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेत कोण आहे त्याला लवकर बोलवा असे सांगण्यात आले त्याचप्रकारे सातारा मध्ये घडत असणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा का घातला जात नाही गंभीर गुन्ह्यांमध्ये असणारे व्यक्ती कसे सुटतात अशीही अनेक प्रश्न गृहराज्यमंत्र्यांनी विचारले अचानकपणे आल्यामुळे कोणाला काहीच सुचत नव्हते मात्र हे रूप बघून सर्व पोलीस दल भांबावून गेले गृहराज्यमंत्री यांचे रौद्ररूप पाहून गुन्हेगारी जगतातील लोकांचे धाबे दणाणले आहेत आता यापुढे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण सातारकरांचे लक्ष लागून आहे